सिंगापूरमधील मराठी नाटकप्रेमी रसिकहो, नमस्कार!
एकाहून एक दर्जेदार, मराठी नाटके स्थानिक कलाकारांना घेऊन आपणासमोर सादर करण्याच्या दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे महाराष्ट्र मंडळ सिंगापूर प्रस्तुत करत आहे, शेवटच्या क्षणापर्यंत खुर्चीला खिळवून ठेवणारे गूढ, थरारक आणि विलक्षण रहस्यमय दोन अंकी नाटक
मास्टर माइंड
मूळ गुजराती लेखक: उत्तम गाडा
मराठी रुपांतर आणि दिग्दर्शन: योगेश तडवळकर
कलाकार: राहुल फोंडके, स्मिता मुंगीकर, गौतम मराठे, मानसी सोमण, स्वप्निल लाखे, प्राजक्ती मार्कंडेय आणि अमित जोशी
संगीत: अक्षय अवधानी
घडणार कुठला भयंकर गुन्हा? कोण असणार साक्ष? कोणाचा जाणार बळी? आणि कोण आहे सगळ्यामागचा मास्टर माइंड? गुजराती रंगभूमीवर तब्बल २१ वर्षे चाललेल्या, ७०० हून अधिक प्रयोग झालेल्या आणि परेश रावळ यांनी गाजवलेल्या तुफान यशस्वी नाटकाचा जगातील हा पहिलाच मराठी प्रयोग! चुकवू नका!!
प्रयोगाची तारीख आणि वेळ: शनिवार ९ सप्टेंबर २०१७ ५वा.
स्थळ: खू ऑडिटोरियम, सिंगापूर चायनीज गर्ल्स स्कूल, 190 Dunearn Road, Singapore 309437
पार्किंग: शाळेच्या आवारात उपलब्ध
तिकीट दर: (सदस्य व सदस्येतर दर एकच)
|
२९ आॅगस्ट रात्री ११ पर्यंत बुक केल्यास |
३० आॅगस्ट ते ९ सप्टेंबर दु १२ पर्यंत |
पुढील रांगा (A ते I) |
२५$ + २.२५$ processing fee |
३०$ + २.२५$ processing fee |
मागच्या रांगा (J ते U) |
१५$ + २.२५$ processing fee |
२०$ + २.२५$ processing fee |
Please note:
Payment terms & Other information: