गणपतीची देणगी इथे द्यावी CLICK HERE for MMS Ganeshotsav '26 Donation
नमस्कार मंडळी,
आपल्या लाडक्या बाप्पांचे आगमन काही महिन्यांवर येऊन ठेपले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपण Little India (2 Owen Road, Farrer Park, Singapore 218842) येथे सार्वजनिक गणेशोत्सवाचे भव्य आयोजन करणार आहोत.
त्यासाठी आपल्याला येत्या काही दिवसात अधिकृत परवाने तसेच मंजुरी मिळणे अपेक्षित आहे.
गणेशोत्सव आपल्यासाठी केवळ एक सण नाही, तर तो संस्कृती जतन करण्याचा आणि एकत्र येण्याचा उत्सव आहे. मंडप, सजावट, सामाजिक उपक्रम आणि मंडपातील सुरक्षा व स्वच्छता यासाठी मोठ्या प्रमाणावर मंडळ आर्थिक तरतूद करत असते. त्यासाठी यावर्षीही आपले सहकार्य व आर्थिक पाठिंबा लाभेल अशी आशा आहे.
तरी आपण या उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी व सामाजिक कार्यात हातभार लावण्यासाठी, आपल्या क्षमतेनुसार यथाशक्ती ऐच्छिक देणगी (वर्गणी) देऊन बाप्पाच्या चरणी सेवा रुजू करावी, ही नम्र विनंती.
बाप्पा आपणा सर्वांना सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य देवो, हीच प्रार्थना!
देणगीसाठी ई-मेलमध्ये दिलेले पर्याय वापरून सहज ऑनलाईन योगदान देता येईल.
देणगीसाठी:
1. Pay using this UEN: S94SS0093G
2. Pay using this QR Code:
3. Account transfer to DBS Bank
Account #: 0019044375
Account Type: Current Account
Account Holder's Name: Maharashtra Mandal (Singapore)
Subject: GE8 Ganeshotsav Donation
4. Use other payment options using the following link
सस्नेह,
म.मं.सिं. कार्यकारिणी
Get Tickets for "मराठी नाटक : अमर फोटो स्टुडिओ "
महाराष्ट्र मंडळ सिंगापूर सहर्ष सादर करत आहे,
मराठी रंगभूमीवरील एक गाजलेले, खुमासदार आणि मनोरंजक नाटक...
अमर फोटो स्टुडिओ!
लेखक: मनस्विनी लता रवींद्र
दिग्दर्शक: मानसी मराठे
सादरकर्ते : महाराष्ट्र मंडळ सिंगापूरचे गुणी कलाकार
शनिवार, 17 ऑक्टोबर 2026, दुपारी 4:00 वाजता
स्थळ: GIIS Punggol auditorium (GIIS SMART Campus), 27 Punggol Field Walk, Punggol, Singapore
तिकीटांचे दर खालीलप्रमाणे:
Category - Gold
Members: Adult - SGD 20.00; Child - SGD 15.00
Non-Members: Adult - SGD 30.00; Child - SGD 20.00
Category - Platinum
Members: Adult - SGD 25.00; Child - SGD 20.00
Non-Members: Adult - SGD 35.00; Child - SGD 25.00
*Child - Age 5 to 12 Years
मंडळी एक खुशखबर!!!!! गणेशोत्सवानिमित्त तिकिटावर $5 ची विशेष सवलत ! अनंत चतुर्दशी, म्हणजेच २५ सप्टेंबरपर्यंत या सवलतीचा लाभ घेता येईल.
तर मंडळी, लवकरात लवकर या सवलतीचा लाभ घेऊन आपली तिकिटं बुक करा..
धन्यवाद !
महाराष्ट्र मंडळ सिंगापूर
NOTE: Kindly ensure membership status and selected ticket type while booking as ticket cancellation/modification option is not available.
म.मं.सिं. आयोजित 'भोंडला आणि दांडिया २०२६.'
ठळक वैशिष्ठे:
दिवस: शनिवार, २४ ऑक्टोबर २०२६
वेळ: संध्याकाळी ६.०० ते ९.००
ठिकाण: Multipurpose Hall Level 6, Global Indian International School (GIIS) SMART Campus, 27 Punggol Field Walk, S828649
कार्यक्रम:
सायं ६.०० ते ६.३० - भोंडला
सायं ६.३० ते ९.०० - दांडिया / गरबा
नावनोंदणी शुल्क:
म.मं.सिं. सभासद आणि सभासदेतर - S$१५
१२ वर्षांखालील मुलांना प्रवेश निःशुल्क
Registration
अधिक माहितीसाठी feedback@mmsingapore.org वर, किंवा रेश्मा वैद्य (८२०९६५६३) / जुईली वाळिंबे (८२९१७८५९) यांना WhatsApp वर संपर्क करावा.
धन्यवाद,
आपली म. मं. सिं. कार्यकारिणी
=============================================================
MMS Bhondla & Dandiya is back! Join us for a traditional Marathi Bhondla and then a Dandiya evening this year with your friends and family. There'll be - DJ Music - Food on sale - Dandiya sticks are not Mandatory (Bring your own dandiya sticks if you wish to use)
- Ganeshotsav 2026 - Aras Spardha Results & Prize Distribution
Date: Saturday, 24th October 2026 Time 6:00 p. m. - 9:00 p. m.
Venue: Multipurpose Hall Level 6, Global Indian International School (GIIS) SMART Campus, 27 Punggol Field Walk, S828649
Programme: 6:00 - 6:30 p. m. : Bhondla 6:30 - 9:00 p. m. : Dandiya, Garba
Fees:
MMS Members & Non-Members - S$15 Kids below 12 years of age - FreeBook your tickets ONLINE now.
For more information, please email: feedback@mmsingapore.org or WhatsApp to Reshma Vaidya (82096563) / Juilee Walimbe (82917859).
Warm Regards, MMS Karyakarini
P.S.: Download bhondla songs here.
Download Member's AppIOS / Android
Established 1994 | UEN S94SS0093G138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906 Fax # : 63993699