सामान्यांतले असामान्य !
परवाच एका वर्तमानपत्रामध्ये एक बातमी आली होती. हैदराबादचे मोहम्मद नूर उद्दीन - जे गेली ३३ वर्षं इंग्रजी नीट येत नसल्याने दहावीची परीक्षा नापास होत होते - ते शेवटी वयाच्या ५१ व्या वर्षी दहावी पास झाले. इथेतिथे मोलमजुरी करून जगणाऱ्या नूर उद्दीन ह्यांना गरिबीमुळे इंग्रजीची शिकवणी वगैरे लावणं शक्य नव्हतं, पण आपण दहावी पास झालो तर आणखी चांगली नोकरी लागून कुटुंबाची काळजी घेता येईल म्हणून त्यांनी नेटाने स्वतःच स्वतःला थोडं थोडं इंग्रजी शिकवत ठेवलं आणि अखेर परीक्षेत यश मिळवून दाखवलं!
सामान्य असूनही 'ठेविले अनंते तैसेचि' न राहता असा असामान्य विचार, परिश्रम, आणि कलात्मकतेने आपल्याला स्फूर्ती देणारे लोक, प्रसंग, आणि घटना विषद करणारे साहित्य हा यंदाच्या 'जे जे उत्तम' चा विषय आहे. कार्यक्रम zoom द्वारे २४ ऑगस्ट ला live प्रेक्षपित करण्यात येईल.
सूचना:
अधिक माहितीसाठी अस्मिता तडवळकर (81686142) यांच्याशी संपर्क साधावा.
सस्नेह - म. मं. सिं. कार्यकारिणी
Download Member's AppIOS / Android
Established 1994 | UEN S94SS0093G138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906 Fax # : 63993699