• Home
  • म.मं.सिं. - गणपती मूर्ती कार्यशाळा 2025

म.मं.सिं. - गणपती मूर्ती कार्यशाळा 2025

  • Sun, August 10, 2025
  • 10:00 AM - 12:00 PM
  • Function Room 1, Kerrisdale Condo, 36 Sturdee Road, Singapore 207855
  • 0

Registration


Registration is closed


नमस्कार मंडळी,
गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!

येणाऱ्या गणेशोत्सवाचे औचित्य साधून, महाराष्ट्र मंडळ सिंगापूर घेऊन येत आहे खास लहान मुलांसाठी "गणपती मूर्ती बनवण्याची कार्यशाळा"!

प्रत्येकाला गणपती मूर्ती बनवण्याचा संच देण्यात येईल.

  • ही मूर्ती १००% नैसर्गिक चिकणमातीपासून बनवली जाईल जी पर्यावरणपूरक असेल.
  • मऊ, लवचिक चिकणमातीमुळे लहानमुलांना सहज मूर्ती बनवता येईल.
  • साच्याच्या साहाय्याने शरीर, डोके, हात आणि सोंड तयार करता येईल.
  • मूर्ती कोरडी झाल्यावर त्यावर पर्यावरणपूरक रंग, चमकदार वस्तू वापरून सजावट करता येईल.
  • गणेश चतुर्थी किंवा वर्षभर घरात शोभेसाठी वापरता येईल.

ही कार्यशाळा केवळ मूर्ती बनवण्याबद्दल नसून, लहान मुलांना गणेश चतुर्थीच्या भावनेला अर्थपूर्ण आणि वैयक्तिक पद्धतीने साकारण्याची संधी आहे.

  कार्यशाळेची तारीख:
10 ऑगस्ट 2025, 
सकाळी 10 ते दुपारी 12 (SGT)

  स्थळ:
Function Room 1, Kerrisdale Condo,
36 Sturdee Road, Singapore 207855

समन्वयक:
दीप्ती हिर्लेकर – 88760367

सुचित्रा जंगम - 92724541


कार्यशाळेच्या सूचना:
वय: 7 ते 12 वर्षे (2013 ते 2017 मध्ये जन्मलेली मुले)
नोंदणी लिंक: https://mmsingapore.org/event-6279924
शुल्क: SGD 5
एकूणजागा: 12

प्रत्येक मुलाला महाराष्ट्र मंडळाकडून सहभागाचे प्रमाणपत्र दिले जाईल.
मुलांनी बनवलेल्या मूर्ती गणेशोत्सवात मंडळाच्या स्थळी प्रदर्शित केल्या जातील.
गणेश विसर्जनाच्या दिवशी मूर्ती घरी नेता येईल.


जागा मर्यादित आहेत, म्हणून लवकर नोंदणी करा.

मुलांनी स्वहस्ते बनवलेली मूर्ती त्यांना गणेशोत्सवात वैयक्तिक पातळीवर सहभागी होण्याचा आनंद देईल.


सस्नेह,
ममंसिं कार्यकारिणी



Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software