नमस्कार मंडळी,
शब्दगंधचे बरेच कार्यक्रम कोजागिरीला चंद्राच्या शीतल प्रकाशात, मसाला दूध चाखत झालेले आहेत. पण हा चंद्र निर्माण कसा झाला, त्याचे मूळ काय आहे असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतोच. परंतू असंख्य कवींच्या काव्यरचनेचा तो स्रोत आहे. तसेच त्याच्या रुपात अनेक नाती निर्माण झाली आहेत. बहिणी करता तो भाऊराया आहे, तर बाळ गोपाळांकरता लाडका मामा आहे.
अशा या मोहक चंद्र बिंबाकडे पाहून तुम्हाला एखादे काव्य सुचत असल्यास या वेळच्या शब्दगंधला सादर करावे ही विनंती. आपली स्वरचित कविता किंवा इतर कवींच्या पूर्वप्रकाशित कविता देखील आपल्याला शब्दगंध च्या कोजागिरी विशेष भागात सादर करता येईल.
प्रेम कलिका उमलली कधी, तारा जुळल्या क्षणात
चंद्र पौर्णिमेचा नभी आठवतो, मसाला दूध कपात
चॉकलेट आईस्क्रीमचे वय सरुनी मुले येती वयात
नव भावनाचा स्रोत न सापडे, मनी दरवळे पारिजात
( प्रसिद्ध कवी शशी मामा पिठुरे यांच्या सौजन्याने)
ऑक्टोबर २०२१ महिन्याचे शब्दगंध मैफिलीचे यजमानपद सौ. मोहना व संजय कारखानीस ह्यांच्याकडे आहे आणि यंदाचा विषय देखील त्यांनीच सुचवला आहे.
तपशील पुढील प्रमाणे :
तारीख: मंगळवार १९ ऑक्टोबर २०२१
वेळ : रात्री ९ वा
विषयः स्रोत (उगम)
हा फेसबूक लाईव्ह कार्यक्रम सुनियोजित सादर करता यावा या साठी थोडी पूर्वतयारी पाहिजे.
ज्यांना कविता सादर करायची आहे त्यांनी कृपया आपली नावे लिंकवर जाऊन नोंदवावित.
तसेच आपण जी कविता सादर करणार असाल ती १७ ऑक्टोबर पर्यंत शब्दगंध समितीला पाठवावी ही विनंती.
नोंदणी करतांना आपण सादर करत असलेल्या कवितेचा प्रकार (स्वरचित/ इतर कवींच्या कविता) याची देखील माहिती द्यायची आहे.
वेळ मर्यादा - प्रत्येकी चार मिनिटे.
तुम्हाला काही प्रश्न असल्यास shabdagandha@mmsingapore.org ह्या इ-पत्त्यावर ई-मेल पाठवावी ही विनम्र विनंती.
सस्नेह
- म. मं. सिं. शब्दगंध समिती
Download Member's AppIOS / Android
Established 1994 | UEN S94SS0093G138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906 Fax # : 63993699